Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण’ योजनेची eKYC करून त्रस्त झालेल्या लाखो बहिणींसाठी आजची बातमी अक्षरशः दिलास्याची ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांची तक्रार होती प्रश्न समजत नाहीत… चुकीची उत्तरे दिली गेली… पतीचं काय निवडायचं हेच कळत नाही. सरकारपर्यंत आवाज पोहोचला आणि अखेर मोठा बदल करण्यात आला. आता eKYCचे नवे पर्याय गावोगाव पोहोचले असून विशेषतः घटस्फोटीत, विधवा, आणि ज्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांच्यासाठी स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. Ladki Bahin Yojana
आज सकाळपासून अनेक महिला अंगणवाडी केंद्रांवर म्हणत होत्य आता तरी नीट होईल हो बहिणींनो… आधी फार अवघड होतं. मोबाईलवरून eKYC करताना सर्वात जास्त गोंधळ होत होता. म्हणूनच, आता स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत मोबाईलवर site उघडताच तीन डॉट्सवर क्लिक करून पेज Desktop Mode मध्ये टाका. कारण आधी उत्तर निवडताना चुकीचा पर्याय लागत होता आणि KYC फेल होत होती.
eKYC कशी करायची? (नवीन बदलांसह सोपी पद्धत)
1️⃣ ladkibahin.maharashtra.gov.inवर जा
2️⃣ “e-KYC प्रक्रिया” वर क्लिक
3️⃣ आधार क्रमांक + कॅप्चा टाका
4️⃣ मोबाईलवर आलेला OTP टाका
आता सर्वात महत्त्वाचे bविवाहित / अविवाहित’ आणि नवीन पर्याय
🔸 अविवाहित निवडल्यास:
तुमच्या वडिलांविषयी प्रश्न विचारला जाईल वडील हयात आहेत का नाही? पहिल्यांदा हा प्रश्न नसल्यामुळे अनेक बहिणी अडकत होत्या.
विवाहित निवडल्यास:
आता तीन पर्याय एकदम स्पष्ट दिले आहेत
पती हयात आहेत
पतीचे निधन झाले
घटस्फोटीत
यापैकी योग्य पर्याय निवडला की प्रक्रिया सरळ पुढे जाते.
पती हयात आहेत निवडल्यास
→ पतीचा आधार नंबर
→ पतीच्या मोबाईलवरील OTP
ही पडताळणी करावी लागेल.
पतीचे निधन झाले / घटस्फोटीत निवडल्यास
→ आता eKYC पूर्ण होते
→ पण आवश्यक कागदपत्रे (मृत्यू प्रमाणपत्र / घटस्फोट आदेश) अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समितीकडे जमा करणे बंधनकारक आहे.
जात प्रवर्ग आणि सरकारी नोकरीचे दोन नवीन प्रश्न
पूर्वी अवघड असणारे प्रश्न काढून टाकले आहेत. आता फक्त दोन सोपे प्रश्न घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? कोणी निवृत्ती वेतन घेत आहे का? दोन्ही प्रश्न स्पष्टपणे लिहिले असल्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी झाली आहे.
सबमिट केल्यावर लगेच यशस्वी संदेश
सर्व माहिती भरून Submit केल्यावर तुमची eKYC यशस्वी झाली असा संदेश दिसतो. गावातल्या बहिणी तर म्हणतायत आधी तर नकारच नकार… आता पाच मिनिटात होतंय. सरकारने देखील स्पष्ट केले आहे की ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व महिलांनी KYC पूर्ण करून घ्यावी, नाहीतर योजनेंतील पुढील हप्ते अडचणीचे होऊ शकतात.
हप्त्याचा लाभ कोणत्याही बहिणीला थांबू नये
विधवा, घटस्फोटीत आणि ज्यांच्या वडील-पती हयात नाहीत अशा बहिणींचा अडथळा सरकारने दूर केला आहे. आता कोणत्याही बहिणीची eKYC प्रश्न समजला नाही म्हणून अडकणार नाही. गावोगावी महिलांनी आज मोठा दिलासा घेतला आता खरंच योजना आपल्या पर्यंत पोहोचेल…
1 thought on “लाडकी बहीण eKYC मध्ये नवीन पर्याय! ‘वडील-पती हयात नाहीत’चा मोठा बदल, आधी केली असेल तरीही पुन्हा करा”