सोन्याचा भाव जोरदार कोसळला, दर पाहून बाजारात जमली तुफान गर्दी? जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold market price :भारतात सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा आकाशाला भिडू लागल्या आहेत आणि आज सकाळी सराफा बाजारातून येणाऱ्या बातम्यांनं लोकांचे खरोखर कान टवकारले आहेत कारण एकीकडे सोनं नवीन उच्चांकाकडे धावतंय तर दुसरीकडे चांदीची किंमत तब्बल दोन लाखांच्या दाराशी पोहोचली आहे. १२ डिसेंबरच्या शुक्रवारी बाजार सुरू होताच किमतींच्या फळकुटावर जे नंबर झळकले ते पाहून सामान्य माणूस तर घाबरूनच जाईल कारण आधीच महिनाभर किंमतीत चढ-उतार सुरू होते आणि आता अचानक अशा पद्धतीनं उंच झेप घेतल्यामुळे सर्वच घरांमध्ये चर्चा सुरू झालीय की शेवटी इतक्या महागाईत कुणी सोनं-चांदी घ्यावं तरी कसं.

सध्या सराफा बाजाराची स्थितीच काही वेगळी आहे. कधी किंमत खाली येते म्हणून खरेदीची आशा धरली जाते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती इतकी वर जाते की सोने-चांदी घेणाऱ्या लोकांची पावलं मागे वळतात. आजच्या घडीला MCX वर सोन्याचा वायदा भाव तब्बल २८१ रुपयांनी वाढून १,३२,७५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि चांदीचा तर जोरच वेगळा… सकाळपर्यंत प्रति किलो १,९८,००० रुपयांवर जाऊन चांदीने दोन लाखांचं दार जवळपास ठोठावलं आहे. इतकंच नाही तर कालच्या सत्रात चांदीने १,९८,८१४ रुपयांचा विक्रमी उच्चांकही गाठला होता. गावाकडच्या भाषेत सांगायचं तर “चांदी तर अक्षरशः उधळलीये.” Gold market price

या वाढीमागे फक्त बाजाराचे खेळ नाहीत तर अमेरिकेकडून येणारे संकेतही कारणीभूत आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली आणि पुढच्या वर्षी आणखी कपात होऊ शकते अशी चाहूल दिली. या एका हालचालीवर सोने-चांदीची किंमत जणू धावत सुटली. त्यात आणखी भर म्हणून डॉलरच्या तुलनेत रुपया इतका घसरला की त्याचा थेट आधार भारतातील सोन्याच्या किमतींना मिळाला. ग्रामीण भागातील लोकांनाही आता ह्याची चांगली जाणीव होतेय कारण जे सोनं कधी लग्नासाठी, कधी सुरक्षित गुंतवणूक म्हणून घेतलं जायचं ते आता हाताच्या अंतरावरच दिसत नाहीये.

खरं तर सध्या बाजारात सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा ओढा वाढलाय. शेअर बाजाराचे चढउतार, व्याजदरातील बदल आणि महागाईच्या तणावामुळे अनेक लोक चांदीकडे वळतायत. कोणत्याही परिस्थितीत चांदी विकून पैसे मिळतात ही ग्रामीण भागातील शंभर टक्के खात्री असल्यामुळे मागणी फारच जोरात वाढली आहे आणि याचामुळे दर उच्चांकाकडे धावत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खरेदीदार वाढतायत आणि माल मर्यादित असल्यामुळे किमती स्वतःच वर जात आहेत Gold market price

आजची परिस्थिती अशी आहे की ज्यांनी सकाळी भाव पाहिले त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि ज्यांनी खरेदी पुढे ढकलली होती ते आता म्हणतायत अरे आता तर हाताबाहेर जातंय. पुढची काही दिवस किमती कुठे बसतात हे सांगणं कठीण आहे पण बाजाराची हालचाल पाहता सोनं-चांदीचं येणारे दिवसही अस्थिरच दिसतात.

Leave a Comment