Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकरी सध्या एकाच प्रश्नाने अस्वस्थ आहेत. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता नेमका कधी मिळणार? शेतीमालाला अपेक्षित दर नाहीत, खर्च वाढतोय आणि अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारा हा आर्थिक आधार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतो. मात्र हप्ता येण्याआधीच हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून काढण्यात आल्याची माहिती समोर आल्याने गावागावात चर्चा सुरू झाली आहे.
लाभार्थ्यांची संख्या का कमी झाली?
राज्य आणि केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजनांमध्ये आता कडक तपासणी सुरू केली आहे. “खरे लाभार्थीच योजनेचा फायदा घ्यावा” या उद्देशाने शासनाने पात्रतेचे नियम अधिक काटेकोरपणे राबवायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणजे यादीतील मोठी छाटणी. Namo Shetkari Yojana
याआधी पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्यावेळी सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. मात्र 21 व्या हप्त्याच्या वेळी हा आकडा थेट 92–93 लाखांवर आला. म्हणजेच तब्बल 4 ते 5 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले. आता हाच अनुभव नमो शेतकरी योजनेतही दिसत आहे.
कोणकोणते शेतकरी अपात्र ठरले?
शासनाच्या तपासणीत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. काही शेतकऱ्यांची नावे मृत्यूनंतरही यादीत होती. अशा सुमारे 28 हजार मृत लाभार्थ्यांची नावे थेट वगळण्यात आली. याशिवाय एकाच जमिनीवरून दोन वेळा लाभ घेणारे सुमारे 35 हजार शेतकरी सापडले असून त्यांनाही अपात्र ठरवण्यात आले.
नव्या नियमांनुसार एका कुटुंबातून फक्त एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकाच घरातील दोन-तीन नावे असलेले अर्ज रद्द करण्यात आले. तसेच ITR भरलेले शेतकरी, शासकीय/सेवा क्षेत्रात नोकरी करणारे किंवा नियमांनुसार अपात्र ठरणारे शेतकरीही यादीतून बाहेर पडले आहेत. रेशन कार्डमधील विसंगतीही अनेकांच्या अडचणीचे कारण ठरली आहे.
8 वा हप्ता कधी येणार?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न पैसे कधी मिळणार? राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शेतकऱ्यांमधील वाढती अस्वस्थता पाहता सरकार हा हप्ता लवकर देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यास हा हप्ता 1 जानेवारी 2025 पर्यंत मिळू शकतो.
अफवांपासून सावध रहा
सध्या सोशल मीडियावर विविध तारखा, याद्या आणि दावे फिरत आहेत. मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीचीच वाट पाहावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्याच्या आयुष्यात दोन हजार रुपयांचाही मोठा आधार असतो. बी-बियाणे, खत, घरखर्च या सगळ्यात हा पैसा उपयोगी पडतो. त्यामुळे पात्र असूनही नाव कापले गेले असेल, तर वेळेत दुरुस्ती करून घ्या. आणि पात्र असाल, तर थोडा संयम ठेवा. हप्ता येणार आहे, फक्त योग्य खात्यातच.