रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! या शहराला नवीन वंदे भारती एक्सप्रेस मिळणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande bharat Express News : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. देशभरात वेग, आराम आणि आधुनिकतेचे नवे प्रतीक ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस आता आणखी एका नव्या शहरापर्यंत धावणार आहे. आतापर्यंत रेल्वे नकाशावर फारसा चर्चेत नसलेला नरसापुर शहर आता थेट वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येत असून, या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.Vande bharat Express News

सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून, महाराष्ट्रातच तब्बल १२ वंदे भारत गाड्या धावत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, सोलापूरसारखी प्रमुख शहरे आधीच या सुपरफास्ट सेवेने जोडली गेली आहेत. आता त्याच धर्तीवर इतर राज्यांमधील मध्यम आणि उदयोन्मुख शहरांनाही वंदे भारतची जोड दिली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई सेंट्रल ते विजयवाडा दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता पुढे नरसापुरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा १७ डिसेंबर २०२५ पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. त्यामुळे नरसापुर शहराला पहिल्यांदाच वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनचा लाभ मिळणार आहे.

आजच्या घडीला नरसापुर ते चेन्नई प्रवासासाठी प्रवाशांना जवळपास १३ तासांचा वेळ लागतो. मात्र वंदे भारत सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त ९ तासांत पूर्ण होणार आहे. म्हणजेच थेट ४ तासांची मोठी वेळ बचत होणार आहे, जी रोजच्या प्रवाशांसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.

वेळापत्रकाबाबत बोलायचे झाल्यास, ही वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल येथून सकाळी 5:30 वाजता रवाना होणार असून, दुपारी 2 वाजता नरसापुरला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात हीच गाडी नरसापुर येथून दुपारी 2:50 वाजता सुटेल आणि रात्री 11:45 वाजता चेन्नईला पोहोचेल. व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी हे वेळापत्रक अतिशय सोयीचे ठरणार आहे.

या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस रेनिगुंटा जंक्शन, नेल्लोर, ओंगोल, तेनाली जंक्शन, विजयवाडा जंक्शन, गुडीवाडा जंक्शन आणि भीमावरम टाउन या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे. त्यामुळे केवळ नरसापुरच नव्हे, तर या मार्गावरील अनेक शहरांनाही थेट फायदा होणार आहे.

तिकीट दराबाबत सांगायचे झाल्यास, एसी चेअरकारसाठी 1635 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअरकारसाठी 3030 रुपये इतके तिकीट निश्चित करण्यात आले आहे. वेग, आरामदायी आसन व्यवस्था, स्वच्छता आणि आधुनिक सुविधा पाहता हा दर प्रवाशांसाठी योग्य असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू करण्यात येणार असून, २०२६ च्या सुरुवातीलाच ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात लांब पल्ल्याच्या प्रवासातही वंदे भारत एक नवा अध्याय लिहिणार, हे निश्चित आहे.

एकूणच नरसापुरसारख्या शहराला वंदे भारतची जोड मिळणे म्हणजे त्या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून, व्यापार, पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

1 thought on “रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! या शहराला नवीन वंदे भारती एक्सप्रेस मिळणार!”

Leave a Comment